नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – लग्नाचे आमिष दाखवून एकाने अल्पवयीन मुलीवर वेळोवेळी बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. पीडिता गर्भवती राहिल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भगिरथ आंबेकर (रा.वडाळागाव) असे संशयिताचे नाव आहे. १६ वर्षीय पीडितेने याबाबत फिर्याद दिली आहे. संशयित आणि पीडिता एकाच भागातील रहिवासी असून त्यांच्यात ओळख होती. या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाल्याने ही घटना घडली.
संशयिताने लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केला. यानंतरही त्याने चार महिन्यापूर्वी मुलीस पळवून नेल्याने ती गर्भवती राहिल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून अधिक तपास उपनिरीक्षक शेख करीत आहेत.