नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- मामाच्या घरातील रोकडवर भाचीनेच डल्ला मारल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेत ५० हजाराची रोकड भाचीने चोरून नेल्याचा आरोप करण्यात आला असून, याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार वैदेही शिरसाठ (रा.सदगुरूनगर,अंबड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या भामट्या महिलेचे नाव आहे. याबाबत भरत लाला शिवले (६५ रा.सिडको) या वृध्दाने फिर्याद दिली आहे. शिवले यांची सदर महिला भाची असून ती सोमवारी (दि.३०) रात्री आपल्या मामाच्या घरी आली होती.
घरातील मंडळीचे लक्ष नसल्याची संधी साधत तिने बेडरूममधील कपाटात ठेवलेली ५० हजाराची रोकड चोरून नेल्याचा आरोप करण्यात आला असून अधिक तपास हवालदार परदेशी करीत आहेत.