नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पत्नीचा अश्लिल व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी पतीसह अन्य दोघांविरोधात म्हसरूळ पोलीस ठाण्यात आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मित्रासमवेतील व्हिडीओ पतीने पीडितेच्या सासर आणि माहेरच्या लोकांना पाठविल्याचा आरोप आहे.
दिंडोरीरोडवरील सावरकर गार्डन भागात राहणा-या पीडितेने याबाबत फिर्याद दिली आहे. गेल्या २९ डिसेंबर रोजी सकाळच्या सुमारास संशयित पतीने आपल्या पत्नीच्या मोबाईल मध्ये मित्रासमवेत असलेला व्हिडीओ आपल्या व्हॉटसअप वर घेत हा उद्योग केला. संतप्त पतीने सासरे दीर तसेच भाऊ भावजय आणि मुलास व्हिडीओ पाठविण्यात आल्याने पीडितेने पोलीसात धाव घेतली असून अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक डहाके करीत आहेत.
घरफोडीत २४ हजाराच्या ऐवजावर चोरट्याचा डल्ला
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मखमलाबाद शिवारात झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे २४ हजाराच्या ऐवजावर डल्ला मारला. त्यात रोकडसह, टीव्ही तसेच देवघरातील सामानाचा समावेश आहे. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विद्या राजेंद्र आव्हाड (रा.भगवानबाबा नगर.म.बाद) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. आव्हाड कुटूंबिय १८ ते २१ नोव्हेंबर दरम्यान बाहेरगावी गेले असता ही घरफोडी झाली. अज्ञात चोरट्यांनी आव्हाड यांच्या बंद घराचे कुलूप तोडून कपाटातील ३ हजाराची रोड सोन्याचे कानातले तसेच टीव्ही,देवघरातील चांदीची भांडी आणि भरलेल्या गॅसच्या टाक्या असा सुमारे २४ हजाराचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास हवालदार फुलपगारे करीत आहेत.