शुक्रवार, जून 20, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

भरधाव वाहनाने धडक दिल्याने ५१ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू…नाशिक पुणे मार्गावरील घटना

by India Darpan
सप्टेंबर 18, 2024 | 5:47 pm
in क्राईम डायरी
0
accident 11


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शतपावली करीत असतांना भरधाव वाहनाने धडक दिल्याने ५१ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. हा अपघात नाशिक पुणे मार्गावरील डीजीपीनगर येथे झाला. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोद करण्यात आली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार तुषार बाळकृष्ण धांडे (रा.आकृती हाईटस,डीजीपीनगर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. धांडे शनिवारी (दि.१४) रात्री जेवण आटोपून नेहमीप्रमाणे फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडले असता ही घटना घडली. इंदिरानगर रोडने ते शतपावली करीत असतांना भरधाव अज्ञात वाहनाने त्यांना धडक दली होती. या घटनेत त्यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याबाबत प्रतिक्षा धांडे यांनी दिेलेल्या फिर्यादीवरून अपघाताची नोंद करण्यात आली असून अधिक तपास जमादार बकाल करीत आहेत.

दुचाकीस्वारास त्रिकुटाने बेदम मारहाण करीत लुटले
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दुचाकीवरून घराकडे निघालेल्या एकास त्रिकुटाने बेदम मारहाण करीत लुटले. ही घटना वर्दळीच्या गोळे कॉलनी भागात घडली असून या घटनेत भामट्यांनी रोकडसह मोबाईल बळजबरीने हिसकावून पोबारा केला आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महेश अरविंद चौधरी (४३ रा.अभ्योदय कॉलनी,गंगापूररोड) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. चौधरी रविवारी (दि.१५) रात्री आपल्या अ‍ॅक्टीव्हा दुचाकीने घराकडे जात असतांना ही घटना घडली. गोळे कॉलनीतून ते दुचाकीवर प्रवास करीत असतांना पाठीमागून अ‍ॅक्टीव्हावर ट्रिपलसीट आलेल्या भामट्यांनी लाथ मारून त्यांना खाली पाडले. यानंतर टोळक्याने त्यांना बेदम मारहाण करीत त्यांची हॅण्ड बॅग व मोबाईल बळजबरीने हिसकावून घेत पोबारा केला. हॅण्ड बॅगेत दहा हजाराची रोकड होती. या घटनेत सुमारे १६ हजाराचा ऐवज भामट्यांनी पळविला असून अधिक तपास निरीक्षक जानकर करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

दांम्पत्यावर चाकू हल्ला करीत टोळक्याने कार फोडली…अंबडलिकरोड भागातील घटना

Next Post

निफाडला प्रहार जनशक्ती पक्षाकडून निफाड व चांदवड विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी जाहीर…(बघा व्हिडिओ)

Next Post
Screenshot 20240918 185131 WhatsApp

निफाडला प्रहार जनशक्ती पक्षाकडून निफाड व चांदवड विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी जाहीर…(बघा व्हिडिओ)

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आर्थिक बोलणी करताना सावध राहावे, जाणून घ्या, शुक्रवार, २० जूनचे राशिभविष्य

जून 19, 2025
Untitled 62

शिवसेनेचा ५९ वर्धापनदिन…एकनाथ शिंदे यांचे लाईव्ह भाषण, बघा या लिंकवर

जून 19, 2025
Untitled 61

शिवसेनेचा ५९ वर्धापनदिन…उध्दव ठाकरे यांचे लाईव्ह भाषण, बघा या लिंकवर

जून 19, 2025
Untitled 60

ठाकरे गटाला वर्धापन दिनीच मोठा धक्का….मुंबईतील हे माजी नगरसेवक,पदाधिकारी शिंदे गटात

जून 19, 2025
WhatsApp Image 2025 06 19 at 4.03.25 PM 1068x1424 1 e1750339743397

नागपूर येथील तब्बल ४२६ झोपडपट्ट्यांमधील रहिवाशांना त्यांचे हक्काचे घर

जून 19, 2025
Untitled 59

नाशिकमध्ये गोदीवरी नदीला पूर, नदीपात्रात कार अडकली, भांडी बाजार परिसरात दुकानात पाणी

जून 19, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011