नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- सिडकोतील कालिका पार्क भागात गावठी पिस्तूल बाळगणाºया दोघांना पोलीसांनी बेड्या ठोकल्या. संशयिताच्या ताब्यातून दोन कट्यांसह जीवंत काडतुसे हस्तगत करण्यात आले असून याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात शस्त्रबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विकास वसंत घोडे (३२ रा. घरकुल योजना चुंचाळे) व नवनाथ श्रीराम वाकडे (३४ रा.सावतानगर,सिडको) अशी अटक करण्यात आलेल्या पिस्तूलधारींची नावे आहेत. कालिका पार्क येथील ग्लोरी अपार्टमेंट मागील मनपसंद स्विट भागात फिरणाºया दोघांकडे पिस्तूल असल्याची माहिती अंबड पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार पथकाने धाव घेत दोघांची अंगझडती घेतली असता त्यांच्या ताब्यात सुमारे ५० हजार रूपये किमतीचे दोन गावठी कट्टो जिवंत काडतुसे मिळून आले. याबाबत पोलीस नाईक राहूल जगझाप यांनी फिर्याद दिली असून अधिक तपास उपनिरीक्षक नितीन फुलपगारे करीत आहेत.
बंदी असलेल्या नॉयलान मांजा बाळगणा-या तरूणावर पोलीसांनी कारवाई
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– बंदी असलेल्या नॉयलान मांजा बाळगणा-या तरूणावर पोलीसांनी कारवाई केली. या कारवाईत एक लाख ३२ हजार रूपये किमतीचा मांजाचे गट्टू हस्तगत करण्यात आले असून याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात पर्यावरण संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सागर दिपक गुरव (२६ रा.वाल्मिकनगर,वाघाडी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या मांजा विक्रेत्याचे नाव आहे. छत्रपती संभाजी मार्गावरील मारूती मंदिर परिसरात एक तरूण नॉयलॉन मांजाची विक्री करीत असल्याची माहिती शहर गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकास मिळाली होती. पथकाने बुधवारी (दि.१) रात्री धाव घेतली असता संशयित बाबुलाल नर्सरी जवळ बेकायदा मांजा विक्री करीत होता. संशयिताच्या ताब्यातील प्लॅस्टीक गोणीत सुमारे १ लाख ३२ हजार रूपये किमतीचे मांजा गट्टू आढळून आले असून याबाबत अंमलदार मुक्तार शेख यांनी फिर्याद दिली आहे. अधिक तपास जमादार अशोक बस्ते करत आहे.