नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– लग्नाचे आमिष दाखवत एकाने महिलेवर वेळोवेळी बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. महिलेच्या असाह्यतेचा लाभ उठवत संशयिताने पाच वर्षीय मुलीचेही लैंगिक शोषण केल्याचा आरोप करण्यात आला असून, याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण (पोस्को) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे
टाकळीरोड येथील रामदास स्वामीनगर भागात राहणा-या पीडितेने याबाबत फिर्याद दिली आहे. पीडिता व संशयित एकमेकांचे परिचीत असून महिलेच्या असाह्यतेचा लाभ उठवित संशयिताने लग्नाचे आमिष दाखविले.
गेल्या आठ महिन्यात संशयिताने महिलेच्या घरी जावून तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केला. याकाळात मुलीस सांभाळण्याचा बहाणा करून संशयिताने लैंगिक शोषण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास उपनिरीक्षक पवार करीत आहेत.