नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- प्रतिबंधित नायलॉन मांजा विक्री करणा-या एकाच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या. धुमाळ पॉईंट भागात ही कारवाई करण्यात आली. संशयिताच्या ताब्यातून सुमारे ३८ हजार रूपये किमतीचे ७५ गट्टू हस्तगत करण्यात आले असून, याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुनील ऊर्फ हेमराज मनोहर गायकवाड (रा. मधुबन कॉलनी, पंचवटी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित मांजा विक्रेत्याचे नाव आहे. धुमाळ पॉईट भागात एक तरूण नॉयलॉन मांजा विक्री करीत असल्याची माहिती भद्रकाली पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार सोमवारी (दि.३०) सायंकाळी धाव घेत संशयिताच्या मुसक्या आवळल्या.
मीना कलेक्शन या दुकान परिसरात संशयित बंदी असलेल्या मांजाची विक्री करीत होता. संशयिताच्या ताब्यातून ३७ हजार ५०० रुपये किमतीचे ७५ गट्टू हस्तगत करण्यात आले असून याबाबत अमलदार योगेश माळी यानी फिर्याद दिली आहे. अधिक तपास हवालदार साळुंके करीत आहेत.