नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- रस्त्याने पायी जाणा-या तरूणाची वाट अडवित दोघांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना सातपूर कॉलनीत घडली. या घटनेत कोयता व दगडांचा वापर करण्यात आल्याने युवक जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनिकेत वाल्मिक सोनवणे व यश आहिरे (रा.दोघे बागुल ड्रायव्हींग स्कूल जवळ,अशोकनगर) अशी तरूणावर हल्ला करणा-या संशयितांची नावे आहेत. या घटनेत अक्षय वसंत निरभवने (२४ रा.शांतीदिप सोसा.संदिपनगर,अशोकनगर) हा युवक जखमी झाला आहे. याप्रकरणी वंदना निरभवणे यांनी फिर्याद दिली आहे. अक्षय निरभवणे हा शनिवारी (दि.२८) रात्री सातपूर कॉलनीतील जिजामाता शाळा परिसरातून रस्त्याने पायी जात असतांना ही घटना घडली.
दोघा संशयितानी वाट अडवित त्याचा मोबाईल फोडला. यावेळी निरभवणे याने जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता संशयितापैकी एकाने त्याच्यावर कोयत्याने वार केला तर दुस-याने दगड फेकून मारल्याने तो जखमी झाला असून अधिक तपास उपनिरीक्षक अजिनाथ बटूळे करीत आहेत.