नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- आडगाव शिवारातील कोनार्कनगर व श्रीरामनगर भागात झालेल्या घरफोडींमध्ये चोरट्यांनी सुमारे ७३ हजाराच्या ऐवजावर डल्ला मारला. त्यात रोकडसह सोन्याचांदीच्या दागिण्याचा समावेश आहे. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सारिका चद्रकांत सातभाई (रा. ओमकार रो हाऊस सयाजी पॅलेस मागे,कोनार्क नगर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. सातभाई कुटूबिय रविवारी (दि.२९) बाहेरगावी गेले असता ही घरफोडी झाली. अज्ञात चोरट्यांनी बंद घराचा कडीकोयंडा तोडून हॉलमध्ये ठेवलेल्या पर्समधील रोकडसह सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे ४७ हजार रूपयांचा ऐवज चोरून नेला. असाच प्रकार श्रीरामनगर भागात घडला.
याबाबत अक्षय सुरेश देवरे (रा.गजगणेश रो हाऊस,श्रीरामनगर) यांनी फिर्याद दिली आहे. रविवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी देवरे यांचे घरफोडून सुमारे २५ हजार ५०० रूपयांचा ऐवज चोरून नेला. त्यात सोन्याच्या दागिण्यांसह रोकडचा समावेश आहे. अधिक तपास हवालदार मगर करीत आहेत.