नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- वडाळागावात उघड्यावर जुगार खेळणाऱ्या नऊ जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या. संशयितांच्या ताब्यातून रोकडसह जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले असून याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
समिर हेदर सय्यद,अब्दूल करीम खान,मोईन जैनोद्दीन शेख,जावेद मुसा शेख,जुम्मा नासिर शहा,बाला रज्जाक शेख,वसिम हुसेन पठाण,तौसिफ पिरमोहम्मद सय्यद व सागर भाऊसाहेब आंबोरे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या जुगारींची नावे आहेत. वडाळागावातील सल्ली पॉईंट भागात काही तरूण उघड्यावर जुगार खेळत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार रविवारी (दि.२९) इंदिरानगर पोलीसांनी धाव घेत छापा टाकला असता संशयित बर्फ कारखान्याजवळील मोकळ्या पटांगणात पत्यांच्या कॅटवर तीन पत्ती जुगार खेळतांना मिळून आले.
संशयितांच्या ताब्यातू ४ हजार ८६० रूपयांची रोकड व जुगाराचे साहित्य असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून याबाबत अंमलदार योगेश जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस नाईक परदेशी करीत आहेत.