नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)-मिळकत खरेदी विक्री प्रकरणात सरकारी बाजार मुल्याप्रमाणे स्टॅम्प ड्युटी न भरता शहरातील नामांकित बिल्डर बंधूनी शासन आणि आयकर विभागाची तब्बल साडे सतरा कोटींची फसवणुक केल्याचा प्रकार समोर आला आहे. बनावट दस्तऐवजाच्या माध्यमातून ही फसवणुक झाली असून या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार देवेंद्र युवराज पाटील (रा.राजीवनगर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. नाशिक महापालिका हद्दीतील सर्व्हे नं. ५०५ – १ अ यासी क्षेत्र ५३१० चौ. च्या व्यवहारात ही फसवणुक करण्यात आली आहे. मुळ मालक मोहनसिंग गुरबचनसिंग गोगना तर्फे जनरल मुख्त्यार असलेल्या बांधकाम व्यावसायीक यांचेशी मिळकत व्यवहार करतांना बिल्डर बंधूनी हा घोटाळा केला. संगनमताने बनावट दस्त तयार करून सरकारी बाजार मुल्याप्रमाणे स्टॅम्प ड्युटी न शासनाचा महसूल बुडविला.
तसेच भुसंपादन मोबदल्याची रक्कम स्व:ताकडे येण्यासाठी बनावट दस्त करून आयकर विभागाचीही फसवणुक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात संबधीतांनी १७ कोटी ६२ लाख ९२ हजार रूपयांना गंडविले आहे. अधिक तपास जमादार गायकवाड करीत आहेत.