नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- घरात घुसून परिचीताने एका महिलेचा विनयभंग केल्याची घटना गणेशवाडी भागात घडली. कुटुंबियांसमोर अश्लिल शिवीगाळ करीत संशयिताने हे कृत्य केले असून याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुनिल प्रभाकर चव्हाण (रा.शंकरनगर टाकळीरोड,द्वारका) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. ३६ वर्षीय पीडिता शुक्रवारी (दि.२७) सायंकाळच्या सुमारास आपल्या घरी असतांना ही घटना घडली.
घरी आलेल्या परिचीत संशयिताने कुटुंबियांसमोर तिला अश्लिल शिवीगाळ केली. तसेच तू माझ्या समवेत चल असे म्हणत तिला घराबाहेर ओढून नेत विनयभंग केला. अधिक तपास उपनिरीक्षक प्रकाश नेमाणे करीत आहेत.