नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– शरणपूरोडवरील कुलकर्णी गार्डन भागात गुरूवारी (दि.२६) रात्री चोरट्यानी धुमाकूळ घातला. पैठणी साडी आणि ड्रायफुड विक्री दुकानास लक्ष करीत चोरट्यांनी दुकानांमधील रोकडसह महागड्या पैठण्या आणि ड्रायफुडवर डल्ला मारला. या घटनेत सुमारे दोन लाखाहून अधिक मुद्देमाल चोरीस गेला असून याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमोल राजाराम शिंदे (रा.पारिजातनगर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. शिंदे यांचे कुलकर्णी गार्डन भागात कुलासाई नावाचे पैठणी साडी विक्रीचे दुकान आहे. गुरूवारी मध्यरात्री चोरट्यांनी शिंदे यांच्यास शेजारील मुकेश अमृतलाल तुलसानी यांच्या क्रेव कॉर्नर या ड्रायफुट दुकानाला लक्ष केले. दुकानाच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या खिडकीचे गज कापून चोरट्यांनी ही चोरी केली. कुलासाई या पैठणी साडी विक्री दुकानाच्या गल्यातील ४८ हजार ५०० रूपयांची रोकड,मोबाईल व सुमारे एक लाख रूपये किमतीच्या प्युअर सिल्क पैठणी साड्या तसेच २१ सोन्याच्या नथी चोरट्यांनी चोरून नेल्या.
तस तुलसानी यांच्या ड्रायफुड दुकानात शिरलेल्या चोरट्यांनी गल्यातील १७ हजार ३०० रूपयांची रोकड व सुमारे पाच हजार रूपये किमतीचे ड्रायफुड चोरून नेले. त्यात काजू बदाम,पिस्ता व अक्रोडचा समावेश आहे. अधिक तपास हवालदार बागुल करीत आहेत.
घरफोडीत चोरट्यांनी सव्वा दोन लाखाच्या ऐवजावर मारला डल्ला
नाशिक : पाथर्डी फाटा परिसरातील प्रशांतनगर येथे झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे सव्वा दोन लाखाच्या ऐवजावर डल्ला मारला. त्यात सोन्याचांदीच्या दागिण्यांचा समावेश आहे. याबाबत इंदिरानगर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुनिल वासूदेव जोशी (५५ रा. वक्रतुंड हॉस्पिटलमागे) यानी फिर्याद दिली आहे. जोशी कुटूंबिय मंगळवारी (दि.२४) बाहेरगावी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरात शिरून ड्रेसिंग टेबलवर ठेवलेले सुमारे २ लाख २२ हजार रूपये किमतीचे सोन्याचे अलंकार चोरून नेले. त्यात पाटल्या.लॉकेट,डायमंडचे कानातील झुबके व अंगठीचा समावेश आहे. अधिक तपास पोलीस नाईक परदेशी करीत आहेत.