नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- भंगार वेचणाऱ्या अल्पवयीन मुलासोबत अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करणाऱ्या तीन अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी हे मनमाड येथे बालनिरीक्षण गृहात समुपदेशक म्हणून काम करतात. त्यांनी एका बालकाकडे चौकशी केली असता त्या बालकाने सांगितले, की दि. ९ नोव्हेंबर २०२४ रोजी नाशिक येथील निरीक्षण गृहात दाखल होण्याच्या १० ते १२ दिवसांपूर्वी २० ते २५ वयोगटातील तीन अनोळखी इसमांनी संगनमत केले. पीडित मुलगा हा सायंकाळच्या सुमारास नाशिकरोड रेल्वे स्थानक परिसरात भंगार गोळा करीत होता. त्यावेळी या तिघा आरोपींनी त्याला जवळ बोलावले व त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केले.
दरम्यान, फिर्यादी यांनी नाशिकरोड रेल्वे पोलीस ठाण्यात पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील तपासी अधिकारी यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. त्यामध्ये घटनास्थळ हे नाशिकरोड रेल्वे स्टेशन परिसरात असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे हा गुन्हा नाशिकरोड पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक माळी करीत आहेत.