नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पार्क केलेल्या कारची काच फोडून चोरट्यानी लॅपटॉप व लेदर बॅग चोरून नेली. ही घटना कालिकानगर भागात घडली. फिर्यादी जॉस जॉर्ज (रा. पोरवाल रोड, पुणे) हे काही कामानिमित्त नाशिक येथे आले होते. त्यांनी कालिकानगर येथे एलआयसी कार्यालयाजवळ त्यांची गाडी उभी करून ते कामानिमित्त निघून गेले.
त्यावेळी अज्ञात चोरट्याने जॉर्ज यांच्या गाडीच्या डाव्या बाजूच्या दरवाजाची काच फोडून गाडीत असलेला २० हजार रुपये किमतीचा एचपी कंपनीचा लॅपटॉप व एक हजार रुपये किमतीची लेदर बॅग, तसेच क्रेडिट व डेबिट कार्ड असा २१ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार गाढवे करीत आहेत.