नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– मागील भांडणाची कुरापत काढून चार जणांनी महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी महिला ही पाथर्डी फाटा परिसरात राहते. आरोपी चौघांनी संगनमत करून मागील भांडणाची कुरापत काढून फिर्यादी महिलेसमोर मोटारसायकल आडवी लावली. तिच्याकडे पाहून चौघा आरोपींनी अश्लील हावभाव केले, तसेच तुला मारून टाकीन, असा दम देत स्त्रीमनास लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करून तिचा विनयभंग केला व लाकडी दांड्याने मारहाण करून तिला गंभीर दुखापत केली. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, याबाबत पुढील तपास पोलीस हवालदार पवार करीत आहेत.
विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पतीसह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नोकरी करून घरातील सर्व कामे तूच करीत जा, असे म्हणून विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पतीसह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी विवाहितेचे उपनगर परिसरात माहेर आहे. ही विवाहिता दि. २६ जानेवारी ते २९ मार्च २०२३ या कालावधीत सिंहगड रोड, पुणे येथे सासरी नांदत होती. त्यावेळी पती, सासू, सासरे व दीर यांनी संगनमत करून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केला व “नोकरी करून घरातील सर्व कामे तूच करीत जा,” असे म्हणत पतीसह चौघांनी संगनमत करून मारहाण करून विवाहितेला शिवीगाळ केली. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात चौघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार बोडके करीत आहेत.