नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहर परिसरात वेगवेगळ्या ठिकाणांहून चार मोटारसायकली अज्ञात चोरट्यांनी चोरल्याच्या घटना घडल्या आहे. पहिली घटना ईदगाह मैदान येथे घडली. फिर्यादी चैतन्य मधुकर मते (रा. रामवाडी, पंचवटी) हे १८ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास ईदगाह मैदान येथे गेले होते. त्यावेळी त्यांनी पाण्याच्या टाकीजवळ एमएच १५ जीएन ४३१९ या क्रमांकाची ४०हजार रुपये किमतीची होंडाशाईन मोटारसायकल पार्क केली होती. ही मोटारसायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेली. या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात मोटारसायकलचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार गाढवे करीत आहेत.
वाहनचोरीचा दुसरा प्रकार दहिपूल येथे घडला. फिर्यादी भरत झुंबरलाल आबड (रा. श्रीगणेश संकुल, कॉलेज रोड, नाशिक) यांनी १७ डिसेंबर रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास दहिपुलाच्या जवळील आबड क्लिनिकनजीक एमएच १५ ईवाय ७१९४ या क्रमांकाची ४० हजार रुपये किमतीची ॲक्टिव्हा मोपेड पार्क केली होती. ही मोटारसायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेली. या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार बागूल करीत आहेत.
वाहनचोरीचा तिसरा प्रकार उत्तमनगर येथे घडला. फिर्यादी किरण किशोर जाधव (रा. सर्वेश्वर चौक, उत्तमनगर) यांनी राहत्या घरी एमएच १५ एचटी ६०७१ या क्रमांकाची ४० हजार रुपये किमतीची स्प्लेंडर प्लस दुचाकी उभी केली होती. ही दुचाकी अज्ञात भामट्याने चोरून नेली. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार टोपले करीत आहेत.
वाहनचोरीचा चौथा प्रकार नाशिकरोड येथे घडला. फिर्यादी अशोक रामचंद्र चव्हाण (रा. गंधर्वनगरी, नाशिकरोड) यांनी राहत्या घराजवळ एमएच १५ एफएच १२०७ या क्रमांकाची ४० हजार रुपये किमतीची बजाज पल्सर मोटारसायकल उभी केली होती. ही मोटारसायकल १० ते ११ सप्टेंबरदरम्यान अज्ञात चोरट्याने चोरून नेली. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गोसावी करीत आहेत.