नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहरात आत्महत्येचे सत्र सुरूच असून शुक्रवारी (दि.२०) वेगवेगळया भागात राहणा-या तीघांनी गळफास लावून घेत आपले जीवन संपविले. तिघांच्याही आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याबाबत पंचवटी,अंबड आणि नाशिकरोड पोलीस ठाण्यात मृत्यूच्या नोंदी करण्यात आल्या आहेत. पेठरोड येथील रोहित विजय अहिरे (२४ रा.कालिकानगर, पेठरोड) या युवकाने शुक्रवारी सकाळच्या सुमारास अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात अँगलला साडी बांधून गळफास लावून घेतला होता. बेशुध्द अवस्थेत चुलत भाऊ रोशन अहिरे यांनी त्यास तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी तपासून मृत घोषीत केले. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार कुलकर्णी करीत आहेत.
दुसरी घटना भोर टाऊनशिप भागात घडली. कैलास वामन कचवे (५६ रा.म्हाडा कॉलनी,म्हाडा बसस्टॉपजवळ,अंबड) यांनी शुक्रवारी दुपारच्या सुमारास अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात पंख्याच्या हुकास दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. मुलगा किरण पारिस यांनी त्यांना तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी तपासून मृत घोषीत केले. याबाबत अंबड पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार चव्हाण करीत आहेत.
तिसरी घटना पळसे ता.जि.नाशिक येथे घडली. नवनाथ तानाजी सरोदे (३० रा.सरोदे मळा,पेट्रोल पंपामागे पळसे ता.जि.नाशिक) यांनी शुक्रवारी सायंकाळी अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात लोखंडी अॅगलला दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यास तात्काळ परिसरातील नागरीकांनी बिटको रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. याबाबत नाशिकरोड पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस नाईक पवार करीत आहेत.