नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- औद्योगीक वसाहतीतील आझादनगर भागात राहणा-या २९ वर्षीय विवाहीतेने गळफास लावून घेत आत्महत्या केली. सदर महिलेच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सुवर्णा सचिन मुसळे (रा. मिना ट्रेंडर्स शेजारी आझादनगर,सातपूर अंबड लिंकरोड) असे मृत महिलेचे नाव आहे. सुवर्णा मुसळे यांनी मंगळवारी (दि.१७) रात्री अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरातील बेडरूममध्ये लोखंडी अॅगलला साडी बांधून गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच दीर ऋषिकेश मुसळे यांनी त्यांना तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी तपासून मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार टोपले करीत आहेत.
जुगार खेळणा-या पाच जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- उघड्यावर जुगार खेळणा-या पाच जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या. या कारवाईत रोकडसह जुगाराचे साहित्य असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनिल पांडूरंग कोरडे, ज्ञानेश्वर मुरलीधर पालवे, मोहन मुरलीधर पालवे, चंदू नाना बाबर व बाळू हरी गुंबाडे (रा. सर्व शिवाजीवाडी,पाथर्डीरोड) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित जुगारींची नावे आहेत. याबाबत अंमलदार गणेश बोरणारे यानी फिर्याद दिली आहे. नंदिनी नदी किनारी असलेल्या एका झाडाखाली काही इसम जुगार खेळत असल्याची माहिती मुबई नाका पोलीसांना मिळाली होती.
त्यानुसार बुधवारी (दि.१८) सायंकाळी पथकाने धाव घेतली असता संशयित पत्यांच्या कॅटवर पैसे लावून तीन पत्ती जुगार खेळतांना मिळून आले. संशयितांच्या ताब्यातून १ हजार ४३० रूपयांची रोकड व जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक शिरसाठ करीत आहेत.