नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- हिरावाडीत भरदिवसा झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे सव्वा पाच लाखाच्या ऐवजावर डल्ला मारला. त्यात सोन्याचांदीच्या अलंकाराचा समावेश आहे. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माणिक परशराम गिते (रा.दवे फरसान मागे,सरस्वतीनगर) यानी फिर्याद दिली आहे. गिते कुटुंबिय बुधवारी (दि.१८) दुपारी अल्पशा कामानिमित्त घराबाहेर पडले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून बेडरूममधील कपाटात ठेवलेले सुमारे ५ लाख १५ हजाराचे सोन्याचांदीचे दागिणे चोरून नेले. त्यात लक्ष्मी आणि राणी हार,पोत,सोनसाखळी,अंगठी,गोफ आणि मंगळसुत्र आदी दागिण्यांचा समावेश आहे. अधिक तपास उपनिरीक्षक कैलास जाधव करीत आहेत.
…..
विद्यार्थ्याचा मोबाईल चोरट्यांनी केला लंपास
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- रस्त्याने पायी जाणा-या विद्यार्थ्याच्या हातातील मोबाईल दुचाकीस्वार भामट्यानी हिसकावून नेल्याची घटना द्वारका परिसरात घडली. या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सागर शंकर भिल्ल (रा.नागझिरा,नंदूरबार हल्ली आदिवासी बॉईज होस्टेल बोधलेनगर) या विद्यार्थ्याने याप्रकरणी फिर्याद दिली आहे. सागर भिल्ल हा मुलगा बुधवारी (दि.१८) सायंकाळच्या सुमारास द्वारका भागातून आपल्या होस्टेलच्या दिशेने पायी जात असतांना ही घटना घडली. मारूती वेपर्स जवळील सीएनजी किट बसविण्याच्या दुकानासमोरून तो मोबाईलवर बोलत जात असतांना मोपेडवर ट्रिपलसिट आलेल्या भामट्यांनी त्याच्या हातातील सुमारे ११ हजार रूपये किमतीचा मोबाईल हिसकावून नेला. अधिक तपास हवालदार बाविस्कर करीत आहेत.