नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- सिडकोतील सुंदरबन कॉलनी भागात झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे अडीच लाखाच्या ऐवजावर डल्ला मारला. त्यात ९० हजाराच्या रोकडसह सोन्याचांदीच्या दागिण्यांचा समावेश असून याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वसंत भाऊराव सुर्यवंशी (रा.सुंदरबन कॉलनी,भुजबळ फार्म जवळ) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. सुर्यवंशी कुटुंबिय शनिवारी (दि.१४) बाहेरगावी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून बेडरूममधील कपाटात ठेवलेली ९० हजाराची रोकड सोन्याचांदीचे दागिणे व महत्वाची कागदपत्र असा सुमारे २ लाख ६० हजाराचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास उपनिरीक्षक धुनावत करीत आहेत.
महिलेच्या गळयातील मंगळसूत्र दुचाकीस्वारांनी केले लंपास
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– रस्त्याने पायी जाणा-या महिलेच्या गळयातील मंगळसूत्र दुचाकीस्वार भामट्यांनी ओरबाडून नेले. ही घटना नाशिक पुणे मार्गावरील शिखरेवाडी भागात घडली. या घटनेत सुमारे ३० हजाराच्या सोन्याच्या मंगळसुत्रावर भामट्यांनी डल्ला मारला असून याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिपीका किरण कर्पे (रा.शिखरेवाडी,ना.रोड) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. कर्पे या मंगळवारी (दि.१७) सायंकाळच्या सुमारास घर परिसरातील गिरणीवर दळण टाकण्यासाठी जात असतांना ही घटना घडली. पार्क ह्यू अपार्टमेंट परिसरातून त्या पायी जात असतांना समोरून दुचाकीवर डबलसिट आलेल्या भामट्यांनी त्यांच्या गळ््यातील मंगळसुत्र हिसकावून पोबारा केला. अधिक तपास पोलीस नाईक हिवाळे करीत आहेत.