नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- सिडकोतील उपेंद्रनगर भागात राहणा-या ३९ वर्षीय व्यक्तीने गळफास लावून घेत आत्महत्या केली. सदर इसमाच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याबाबत अंबड पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
रोशन मदन बडगुजर (रा.रो हाऊस नं. २५,अंबड लिंकरोड उपेंद्रनगर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. बडगुजर यांनी सोमवारी (दि.१६) सकाळच्या सुमारास अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरातील हॉलमध्ये पंख्याच्या हुकास नॉयलॉन पट्टा बांधून गळफासलावून घेतला होता.
ही बाब निदर्शनास येताच कुटूंबियांनी त्यास तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी तपासून मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार बनतोडे करीत आहेत.