नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आयटी इंजिनिअर असलेल्या तरूणीवर पुण्यात सलग आठ महिने बलात्कार करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. लग्नाचे आमिष दाखवत परप्रांतीय युवकाने लव्ह इन रिलेशनमध्ये वास्तव्यास ठेवत हे कृत्य केले आहे. तरूणीच्या वडिलोपार्जीत प्रॉपर्टीवर दावा करीत संशयिताने लग्नास नकार दिल्याने युवतीने पोलीसात धाव घेतली आहे. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार वैभव अशोक पाटील (३० रा.थेटेनगर,पुणे), अशोक लक्ष्मण पाटील व मिनाक्षी अशोक पाटील (रा.दोघे रतलाम मध्यप्रदेश) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत शहरातील म्हसरूळ भागात राहणा-या २८ वर्षीय पीडितेने फिर्याद दिली आहे. पीडिता व परप्रांतीय संशयित वैभव पाटील हे दोघेही आयटी इंजिनिअर आहेत. गेल्या वर्षी ती मुंबईत खासगी कंपनीत नोकरीस होती. तर संशयित पुण्यातील नामांकित कंपनीत नोकरी करतो. सोशल मिडीयावर विवाह नोंदणी करून वधू वरांचा शोध घेत असतांना दोघे एकमेकांच्या संपर्कात आले. संशयिताने मध्यप्रदेशात राहणा-या आपल्या आई वडिलांना सोबत घेत नाशिकमध्ये येवून मुलीस पसंती दर्शविल्याने हा प्रकार घडला. दोन्ही कुटूंबियाने वधूवरास लग्नानंतर पुण्यात स्थायीक करण्याचा निर्णय घेतल्याने मुलीने मुंबईतील नोकरी सोडून पुणे गाठले. वैभव पाटील याच्या सोबत काही काळ ती लव्ह इन रिलेशन मध्ये वास्तव्यास होती.
या काळात लग्नाचे आमिष दाखवून संशयिताने तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केला. तर अशोक पाटील यांनी तिचा विनयभंग केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यानच्या काळ मुलीच्या वडिलांच्या नावे असलेली नाशिकमधील सदनिका संशयित वैभव पाटील याच्यानावावर करावी असा आग्रह पाटील कुटूंबियाने लावून धरल्याने हा प्रकार घडला असून लग्नास नकार देण्यात आल्याने उच्चशिक्षत युवतीने पोलीसात धाव घेतली आहे. अधिक तपास उपनिरीक्षक मनोहर क्षिरसागर करीत आहेत.