नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- द्वारका भागात पत्र्याच्या शेडमध्ये राजरोसपणे सुरू असलेला बेकायदा कत्तलखाना पोलीसांनी उदध्वस्त केला. या ठिकाणी गोवंश जनावरांची हत्या केली जात होती. या कारवाईत दोघा कसाईंना बेड्या ठोकत पोलीसानी सहा जणांवरांची सुटका केली असून, ३०० किलो वजनाचे मांस व कातडी हस्तगत करण्यात आली आहे. याप्र्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात जागा मालकासह जणावरे खरेदी विक्री करणाºया आणि कसाई अश्या चार जणांविरोधात प्राणि संरक्षण अधिनियम कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वसिम पिरण शहा (२९ रा.सादिकनगर,वडाळागाव) व सादिक महम्मद कमलशेख (३० रा.काजीपुरा,जुने नाशिक) अशी अटक केलेल्या संशयित कसाईंची नावे असून जनावरांचा व्यापार करणारे शब्बीर कुरेशी व मुकेश कुरेशी तसेच कत्तलीसाठी पत्र्याचे शेड उपलब्ध करून देणारा जागा माल बुºहानभाई (रा.बागवानपुरा) यांचा पोलीस शोध घेत आहेत. याप्रकरणी शहर गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाचे अंमलदार अशोक आघाव यांनी फिर्याद दिली आहे. द्वारका येथील हजरतबाबा दर्गा भागात बेकायदा कत्तलखाना सुरू असल्याची माहिती गुंडाविरोधी पथकाला मिळाली होती.
त्यानुसार रविवारी (दि.१५) पथकाने छापा टाकला असता हरिमंजील जवळील लोखंडी कंपाऊड असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये दोघे कसाई जनावरांची कत्तल करतांना मिळून आले. घटनास्थळावर तीन जनावरांचे सुमारे ६० हजार रूपये किमतीचे सुमारे ३०० किलो मांस जप्त करीत कत्तलीसीठी आणलेली सुमारे दोन लाख रूपये किमतीची सहा जनावरांची पोलीसांनी सुटका केली आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक सत्यवान पवार करीत आहेत.