नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- बंदी असलेला नॉयलॉन मांजा विक्री करणारा विक्रेता पोलीसांच्या जाळय़ात अडकला. संशयिताच्या ताब्यातून ३३ हजार रूपये किमतीचे मांजाचे गट्टू जप्त करण्यात आले असून, ही कारवाई रामवाडी पुल परिसरातील घारपुरे घाट भागात करण्यात आली. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अभय काशिनाथ वाणी (५३ रा. प्रज्ञा प्रतिक्षा सोसा. कोणार्क नगर आडगाव शिवार) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या मांजा विक्रेत्याचे नाव आहे. घारपुरे घाट परिसरातील हनुमान घाट येथे एक इसम नॉयलॉन मांजा विक्री करीत असल्याची माहिती सरकारवाडा पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार पथकाने धाव घेत संशयिताच्या मुसक्या आवळल्या.
या कारवाई सुमारे ३३ हजार रूपये किमतीचे ६० मांजाचे गट्टू पथकाने हस्तगत केले असून याबाबत अंलदार उमेश लहाने यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस दप्तरी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास हवालदार जाधव करीत आहेत.