नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – रस्त्याने पायी जाणा-या महिलेच्या गळयातील मंगळसूत्र दुचाकीस्वार भामट्यांनी ओरबाडून नेल्याची घटना दिंडोरीरोडवर घडली. या घटनेत सुमारे सव्वा लाख रूपये किमतीच्या मंगळसुत्रावर भामट्यांनी डल्ला मारला असून याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविता योगेश मोरे (रा.कलानगर म्हसरूळ) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. मोरे या गुरूवारी (दि.१२) आपल्या मुलीस जेवणाचा डबा देण्यासाठी दिंडोरीरोडवरील श्रीकृष्ण मंगल कार्यालय परिसरात गेल्या असता ही घटना घडली.
स्पार्कल शाळा जवळील विमलबाई बंगल्या समोरून त्या पायी जात असतांना समोरून दुचाकीवर डबलसिट आलेल्या भामट्यांनी त्यांच्या गळयातील सुमारे १ लाख २५ हजार रूपये किमतीची सोन्याचे मंगळसुत्र हिसकावून नेले. अधिक तपास उपनिरीक्षक क्षिरसागर करीत आहेत.