नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- वन संपत्तीचे रक्षण करणा-या प्रमुखाच्या बंगला आवारातून चोरट्यांनी चंदनाची चार झाडे राजरोसपणे कापून नेले आहेत. वनविभागाच्या सुरक्षा यंत्रणेला छेद देत तस्करांनी हे कृत्य केल्याने आश्चर्य व्यक्त होत असून याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुरक्षारक्षक युवराज शंकर जाधव (रा.वरवंडी ढकांबे ता.दिंडोरी) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. जाधव त्र्यंबकरोडवरील मुख्य वनरक्षक वास्तव्यास असलेल्या जारूल बंगल्यावर सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत आहेत. गुरूवारी (दि.१२) अज्ञात तस्करांनी वन सुरक्षेला छेद देत मुख्यवनरक्षक वास्तव्यास असलेल्या जारूल बंगला आवारातील सुमारे ४८ हजार रूपये किमतीचे चार चंदनाचे झाडे बुंध्यापासून कापून नेले. अधिक तपास उपनिरीक्षक चव्हाण करीत आहेत.
सहाव्या मजल्यावरील बाल्कनीतून उडी…इसमाचा मृत्यू
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– सहाव्या मजल्यावरील बाल्कनीतून उडी घेतल्याची घटना गौळाणेरोड भागात घडली. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. हरिकिशन पांडूरंग आव्हाड (४२ रा.प्रभाव इवाना अपा. गौळाणेरोड पाथर्डी फाटा) असे मृत इसमाचे नाव आहे.
आव्हाड यांनी गुरूवारी (दि.१२) अज्ञात कारणातून आपल्या राहत्या इमारतीच्या सहाव्या मजल्यावरील गॅलरीतून उडी घेतली होती. ही बाब निदर्शनास येताच कुटूंबियासह नागरीकांनी त्याना तातडीने जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. अधिक तपास जमादार गांगुर्डे करीत आहेत.