नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- दिंडोरीरोड भागात हॉस्पिटल मध्ये शिरून एकाने गोंधळ घातल्याची घटना घडली. या घटनेत संशयिताने शिवीगाळ करीत सुरक्षारक्षकास मारहाण केली. तसेच तोडफोड करून हॉस्पिटल बंद करण्याची धमकी देत डॉक्टर व रूग्णालयीन कर्मचा-यांना येण्या जाण्यास अटकाव केला. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार जास्मिन उर्फ जीतू पटेल असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबत डॉ. अमित धांडे यांनी फिर्याद दिली आहे. डॉ. धांडे यांच्या निरामय हॉस्पिटल मध्ये बुधवारी (दि.४) हा प्रकार घडला. रात्री अकरा वाजेच्या सुमारास डॉ. रामदास पवार व डॉ. प्रधुन्न यादव हे हॉस्पिटलमध्ये सेवा बजावत होते.
यावेळी बेकायदा रूग्णालयात शिरलेल्या संशयिताने आरडाओरड करीत शिवीगाळ केली. तसेच तोडफोड व हॉस्पिटल बंद करण्याची धमकी देत त्याने डॉक्टर व रूग्णालयीन कर्मचाºयांना येण्याजाण्यास मज्जाव करीत सुरक्षा रक्षक विजय पवार यांना मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास उपनिरीक्षक कैलास जाधव करीत आहेत.