नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहरात वेगवेगळया भागात राहणा-या दोन तरूणींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवित बलात्कार करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. अश्लिल व्हिडीओ व फोटो व्हायरल करण्याची धमकी देण्यात आल्याने युवतीने पोलीसांत धाव घेतली असून याप्रकरणी भद्रकाली आणि इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीत राहणा-या पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार २०२३ मध्ये तिची अक्षय सानप नावाच्या युवकाशी ओळख झाली होती. या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाल्याने संशयिताने युवतीचे लग्नाचे आमिश दाखविले. या काळात त्याने जिल्हा परिषद समोरील पुजा हॉटेल येथे घेवून जात तिच्यावर बळजबरीने बलात्कार केला. हा प्रकार गेल्या वर्षभर सुरू होता. या काळात संशयिताने आपल्या मोबाईलवर अश्लिल व्हिडीओ व छायाचित्र काढले. सरला सानप, उज्वला घुगे, सागर आव्हाड, नितीन घुगे व रंगनाथ सानप या साथीदारांच्या मदतीने तरूणीस त्रास दिला. युवतीचे फेसबुक व अन्य सोशल साईटवर बनावट आयडीच्या माध्यमातून खाते उघडून ते व्हायरल करण्यात आले. या घटनेत नितीन घुगे यानेही विनयभंग केला असून रंगनाथ सानप याने घरी येवून धमकी दिल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास निरीक्षक मोहिते करीत आहेत.
दुसरी घटना पाथर्डी फाटा भागात घडली. सोहिल अल्लावाली शेख (२३) या परिचीताने पीडितेस आपल्या प्रेमाच्या जाळयात अडकवीत सलग दोन वर्ष तरूणीवर बळजबरीने बलात्कार केला. लग्नाचे आमिष दाखवून वेगवेगळया ठिकाणी घेवून जात संशयिताने हे कृत्य केले असून, गर्भ निरोधक गोळय़ा खावू घालून त्याने गर्भपातही केला आहे. याबाबत वाच्यता केल्यास अश्लिल व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याने पीडितेने पोलीसात धाव घेतली असून याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी तात्काळ संशयितास बेड्या ठोकल्या असून अधिक तपास उपनिरीक्षक फुंदे करीत आहेत.