नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- बंदी असलेला नॉयलॉन मांजा विक्री करणारा विक्रेता पोलीसांच्या जाळयात अडकला. संशयिताच्या ताब्यातून ६१ हजार ९०० रूपये किमतीचे मांजाचे गट्टू जप्त करण्यात आले असून, याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
देवेंद्र गोविंद शिरसाठ (२५ रा. सदगुरू अपा.चेहडी पंपीग,खर्जुलमळा) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या मांजा विक्रेत्याचे नाव आहे. सिन्नर फाटा येथील एकलहरा रोडवरील मार्केट यार्ड भागात एक तरूण नॉयलॉन मांजा विक्री करीत असल्याची माहिती नाशिकरोड पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार पथकाने धाव घेत संशयित पोलीसांच्या हाती लागला.
संशयिताच्या अंगझडतीत सुमारे ६१ हजार ९०० रूपये किमतीचे ९७ मांजाचे गट्टू आढळून आले. याबाबत अंलदार समाधान वाजे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस दप्तरी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार टेमगर करीत आहेत.