नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शंकरनगर भागात भरदिवसा झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे नऊ लाखाच्या ऐवजावर डल्ला मारला. त्यात ३५ हजाराच्या रोकडसह सोन्याचांदीच्या दागिण्यांचा समावेश आहे. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
किर्ती त्र्यंबक कदम (रा.शकुंतला अपा.शंकरनगर,गंगाजल नर्सरी जवळ ) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. कदम दांम्पत्य सोमवारी (दि.९) सकाळी नेहमी प्रमाणे बाहेरगावी आपल्या नोकरीच्या ठिकाणी गेले असता ही घटना घडली.
अज्ञात चोरट्यानी बंद घराचा कडीकोयंडा तोडून बेडरूममधील कपाटात ठेवलेली ३५ हजाराची रोकड व सोन्याचांदीचे दागिणे असा ९ लाख ७ हजार रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास सहाय्यक अहिरराव करीत आहेत.