नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- दिंडोरीरोड भागात राहणा-या अल्पवयीन मुलीवर एकाने वेळोवेळी बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. मुलीचा गर्भपात करण्यात आल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात बलात्कारासह पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हिरामण त्र्यंबक खाडे (२४ रा.गंगाम्हाळूंगी ता.जि.नाशिक) असे संशयिताचे नाव आहे. पीडिता व संशयित परिचीत असून त्यांचे एकमेकांच्या घरी येणे जाणे होते. यातून दोघांमध्ये प्रेमसंबध जडले. यातून पीडिता गर्भवती राहिली होती.
कुटुंबियांनी तिला गेल्या शनिवारी (दि.३०) गिरणारे येथील शासकिय रूग्णालयात दाखल केले होते. मात्र तिला जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आल्याने या घटनेचे बिंग फुटले. गर्भपातानंतर हा प्रकार पोलीसात पोहचला असून हरसूल पोलीस ठाण्यात दाखल झालेला हा गुन्हा म्हसरूळ पोलीसांकडे वर्ग करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक परदेशी करीत आहेत.