नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- बँकेतून कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून एकाने महिलेस पंधरा हजार रूपयांना गंडविल्याचा प्रकार समोर आला आहे. आठ महिने उलटूनही कर्ज पदरात न पडल्याने महिलेने पोलीसात धाव घेतली असून याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काझी सलीम उल्लाउद्दीन असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.
याबाबत निता चेतन पाटील (२६ रा.जाधव संकुल चुंचाळे शिवार) या महिलेने याबाबत फिर्याद दिली आहे. पाटील यांना गेल्या वर्षी आर्थीक अडचण होती त्यांमुळे त्यांनी संशयिताची भेट घेतली असता ही फसवणुक झाली. उत्तमनगर येथील एका बँकेतून पाच लाख रूपये कर्ज काढून देण्याचे संशयिताने आश्वासन दिले. या व्यवहारात कर्ज रकमेवर दोन टक्के कमिशन देण्याचे ठरल्याने पाटील यांनी संशयितास दि.११ ते १८ एप्रिल दरम्यान १५ हजाराची रोकड दिली.
मात्र आठ महिने उलटूनही कर्ज मंजूर झाले नाही तसेच संशयिताने पैसेही परत केले नाही. पाटील यांनी तगादा लावला असता संशयिताने टाळाटाळ केल्याने त्यांनी पोलीसात धाव घतली असून अधिक तपास उपनिरीक्षक शेवाळे करीत आहेत.