पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भाजपचे पुण्यातील विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे सख्खे मामा सतीश वाघ यांचे अपहरण करुन हत्या करण्यात आली आहे. मांजरा परिसरात मॅार्निंग वाकला गेलेल्या सतीश वाघ यांचे चौघांनी अपहरण केले होते. त्यानंतर यवत गावाच्या हद्दीत त्यांचा मृतदेह सापडला.
पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास सतीश वाघ यांचे अपहरण झाले होते. अपहरणाचा हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेराते कैद झाला. सतीश वाघ हे राहत्या घरातून मॅार्निंग वॅाक करण्यासाठी घराबाहेर पडले होते. घरापासून काही अंतरावर जात असतांना चार जणांनी त्यांना जबरदस्तीने एका चारचाकी वाहनात डांबल. त्यानंतर त्यांची हत्या करण्यात आली.
सतीश वाघ हे शेतकरी असून हडपसर परिसरातील मांजरी भागात ते शेतीबरोबरच हॅाटेल्स, लॅान्स व्यवसाय आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला.