नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- कुटूंबियास जीवे मारण्याची धमकी देत एकाने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. दुचाकीवर बळजबरीने बसवत गोदाघाट भागात घेवून जात हे कृत्य करण्यात आले असून याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात विनयभंगासह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गौरव ज्ञानेश्वर दवंडे (२७ रा.कलानगर,दिंडोरीरोड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. पीडिता गेल्या शुक्रवारी (दि.६) शिकवणीसाठी दिंडोरीरोड भागात गेली असता ही घटना घडली. काका का ढाबा परिसरातील आदित्य अकादमीच्या दिशेने ती जात असतांना दुचाकीवर आलेल्या परिचीत असलेल्या संशयिताने फुटपाथवर तिची वाट अडविली.
यावेळी संशयिताने कुटूंबियास जीवे ठार मारण्याची धमकी देत मुलीस बळजबरीने आपल्या दुचाकीवर बसविले. यानंतर मुलीस गोदाघाटावर घेवून जात संशयिताने विनयभंग केला. अधिक तपास उपनिरीक्षक क्षिरसागर करीत आहेत.