नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहरात वेगवेगळया भागात राहणा-या दोघीचा परिचीतांनीच विनयभंग केला. त्यातील एकाने आत्महत्येची धमकी देत अल्पवयीन मुलीचा तर शेजा-याने पाठलाग करीत तरूणीचा विनयभंग केला. याप्रकरणी अंबड आणि नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आला आहे.
औद्योगीक वसाहतीत राहणा-या तेरा वर्षीय पीडितेच्या आईने याबाबत फिर्याद दिली आहे. तेरा वर्षीय बालिका परिसरातील शाळेत जाते. सतिश दहाडे नामक युवकाने बुधवारी (दि.४) तिचा विनयभंग केला. शाळेतून परणा-या मुलीचा पाठलाग करीत संशयिताने तिच्या अंगावर कागदी चिठ्या फेकून वाट अडविली. यावेळी संशयिताने तू जर बोलली नाही तर आत्महत्या करील अशी धमकी देत मुलीचा विनयभंग केला. याबाबत अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक संदिप पवार करीत आहेत. दुसरा प्रकार सिन्नर फाटा भागात घडला. खर्जुल मळा भागात राहणा-या युवतीने याबाबत फिर्याद दिली आहे. याबाबत राहूल केदार (२५) नामक युवकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संशयित व पीडिता एकाच इमारतीत वास्तव्यास असून संशयित एकतर्फी प्रेमातून तिचा पाठलाग करतो. तसेच बिल्डींगच्या पार्किंगमध्ये व लिफ्टमध्ये गाठून कसला तरी बहाणा करून बोलण्याचा प्रयत्न करतो. शुक्रवारी (दि.१३) संशयिताने युवतीस गाठून संशयिताने माझ्याशी मैत्री कर असे म्हणत विनयभंग केला. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक कोरडे करीत आहेत.