नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहर परिसरात वाहनचोरीचे सत्र सुरू असून, वेगवेगळ्या भागांतून तीन मोटारसायकली चोरट्यांनी पळवून नेल्या. याबाबत सरकारवाडा सातपूर व नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
अशोकनगर येथील रमेश शांताराम सोनवणे हे शनिवारी (दि.३) मेळा बसस्थानक परिसरात आले होते. पार्किंगमध्ये लावलेली त्यांची एमएच ४१ एवाय ७७१४ दुचाकी चोरट्यांनी चोरून नेली. याबाबत सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास जमादार आहिरे करीत आहेत. दुसरी घटना औद्योगीक वसाहतीतील अशोकनगर भागात घडली. पवन लक्ष्मण भोकरे (रा.राज्य कर्म. सोसा.अशोकनगर) यांनी फिर्याद दिली आहे.
भोकरे यांची स्प्लेंडर एमएच १७ बीएफ ५४६४ गेल्या १९ नोव्हेंबर रोजी रात्री त्यांच्या घरासमोर लावलेली असतांना ती चोरट्यांनी पळवून नेली. याबाबत सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार घारे करीत आहेत. तिसरी घटना सामनगाव रोड भागात घडली. रोहित अशोक ढिकले (रा.तुळजाई हॉटेल मागे,स्न्निरफाटा,सामनगावरोड) यांनी फिर्याद दिली आहे. ढिकले यांची एमएच १५ जेआर ४४४० मोटारसायकल गेल्या २६ नोव्हेबर रोजी सायंकाळच्या सुमारास परिसरातील तुळजाई हॉटेल समोर पार्क केलेली असतांना ती अक्षय धनंजय विसपुते (रा.हनुमान मंदिरासमोर सिध्दीविनायक सोसा.सामनगावरोड) याने चोरून नेली. अधिक तपास पोलीस नाईक पवार करीत आहेत.