नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- महिलेला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अत्याचार करून व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देणाऱ्या विरुद्ध गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने हे कृत्य केल्याचे या पीडित महिलेने तक्रारीत म्हटले आहे.
या घटनेत आरोपी स्वप्नील दत्तात्रय सानप (रा. सामनगाव रोड, नाशिकरोड) याने पीडित महिलेशी मैत्री केली. त्यानंतर २१ सप्टेंबर २०२२ ते ४ नोव्हेंबर २०२४ या दरम्यानच्या कालावधीत आरोपी स्वप्नील सानप याने कारमध्ये, स्वत:च्या घरी, तसेच विविध ठिकाणी पीडितेला फिरायला नेण्याचा बहाणा करून तिला जबरदस्तीने गुंगीचे औषध दिले. त्यानंतर तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित करून त्याचे व्हिडिओ व अश्लील फोटो काढले.
त्यानंतर हे फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन पीडितेसोबत अनैसर्गिक कृत्य करून पीडितेला जातिवाचक शिवीगाळ केली. वारंवार होणाऱ्या या त्रासाला कंटाळून अखेर पीडितेने गंगापूर पोलीस ठाण्यात आरोपी स्वप्नील सानप याच्याविरुद्ध अत्याचाराच्या गुन्ह्यासह ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार करीत आहेत.