नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहर परिसरात वाहनचोरीचे सत्र सुरू असून, वेगवेगळ्या भागांतून तीन मोटारसायकली चोरट्यांनी पळवून नेल्या. याबाबत पंचवटी सरकारवाडा व भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
काळाराम मंदिर परिसरात राहणारे धीरज राजाराम पाटील (रा. टाकळकर वाडा, पंचवटी) यांची एमएच १० सीजे ८९०९ मोटारसायकल सोमवारी (दि.२) रात्री त्यांच्या घरासमोर पार्क केलेली असतांना चोरट्यांनी ती चोरून नेली. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार खाजेकर करीत आहेत.
दुसरी घटना जिल्हा रूग्णालय आवारात घडली. चंद्रगुप्त सुर्यकांत मखरे (रा.गुरूआयप्पा सोसा.पखालरोड) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. मखरे गेल्या २१ नोव्हेंबर रोजी जिल्हारूग्णालयात गेले होते. रेकॉर्ड रूम समोर पार्क केलेली त्यांची एमएच २० बीके ५३४६ मोटारसायकल चोरट्यानी चोरून नेली. याबाबत सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार बागुल करीत आहेत.
तिसरी घटना काठेगल्लीत घडली. वंत नारायण निकम (रा. द्वारकाधीश सोसायटी, काठे गल्ली) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. निकम यांची स्प्लेडर एमएच १५ ईडी ५२३७ गेल्या २३ नोव्हेंबर रोजी रात्री त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेली असतांना ती चोरट्यांनी चोरून नेली. याबाबत भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार सोनवणे करीत आहेत.