नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– ट्रान्सपोर्ट कंपनीच्या गोडावून मधील साहित्यावर दोघा नोकरांनी डल्ला मारल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेत सुमारे साडे नऊ लाखाच्या ऐवजावर भामट्यांनी डल्ला मारला असून, त्यात मोबाईलसह स्मार्ट वॉच,पॉवर बँक आदीचा समावेश आहे. ही घटना सीसीटिव्ही यंत्रणेत कैद झाल्याने हा प्रकार समोर आला असून याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात दोन भामट्या नोंकरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चेतन कृष्णा शिंदे (२२ मुळ रा.सामोडे ता.साक्री) व हर्ष एकनाथ तळेकर (२३ रा.गणेशनगर,वज्रेश्वरीनगर जेलरोड) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित नोकरांची नावे आहेत. याबाबत मयुर भिमराव शिंदे (३६ रा. दत्तवाडी,आकुर्डी पूणे) यांनी फिर्याद दिली आहे. शिंदे यांचे औद्योगीक वसाहतीत इंटेक्स ट्रान्सपोर्टशन सर्व्हीसेस प्रा.लि. नावाची कंपनी आहे. स्वामी विवेकानंद नगर येथे या कपनीचे गोडावून असून तेथे दोघे संशयित कामास आहेत.
१ ते २५ नोव्हेंबर दरम्यान भामट्यांनी गोडावून मधील सुमारे ९ लाख ६३ हजार ८४३ रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. त्यात सॅमसंग,अॅपल,रिअलमी,मोटरोला,विवो वन प्लस नॉड,ओपो,रेडमी आदी नामांकीत कंपनीच्या मोबाईल सह स्मार्ट वॉच,पॉवर बॅक आदींचा समावेश आहे. मालक शिंदे यांना गोडावून मधील सदर ऐवज आढळून न आल्याने त्यांनी सीसीटिव्ही यंत्रणेची तपासणी केली असता चोरीचा हा प्रकार समोर आला असून अधिक तपास जमादार बागुल करीत आहेत.