नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या दहशतवाद विरोधी पथकाने (ATC) धडाकेबाज कारवाई केली आहे. परिसरातून चोरीस गेलेले सुमारे २० लाख रूपये किमतीचे मोबाईल तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे हुडकून काढले असून ते मुळ मालकाना परत करण्यात आले आहेत
पोलीस आयुक्त संदिप कर्णीक परिमडळ २ च्या उप आयुक्त मोनिका राऊत सहायक आयुक्त. सचिन बारी यांनी केंद्र शासनाचे वतीने तयार करण्यात आलेल्या सी.ई.आय.आर. (CEIR) पोर्टलचे सहाय्याने तांत्रिक बाबींचे आधारे हरविलेल्या मोबाईलचा शोध घेणे व गुन्हे तपास करणेचे संदर्भात आदेशित केले होते. त्यानुसार नाशिकरोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांनी नाशिकरोड पोलीस स्टेशन कडील दहशतवाद विरोधी पथकाचे अंमलदार यांना सूचना दिल्या होत्या.
त्यानंतर १ ऑगस्टपासून आजपावेतो नाशिकरोड पोलीस स्टेशन कडील दहशतवाद विरोधी पथकाचे पोहवा संदिप पवार, विष्णु गोसावी, पोना हेमंत मेढे, पोअं राहुल मेहेंदळे यांनी नाशिकरोड पोलीस स्टेशन हददीतील २०२१ ते आजपावेतो प्राप्त तक्रारींची माहिती सी.ई. आय. आर. (CEIR) पोर्टलवर वेळेत भरली. सदर पोर्टलव्दारे प्राप्त माहितीचे तांत्रिक विश्लेषण करून त्याआधारे २८ नोव्हेंबर रोजी पावेतो एकुण-१३० मोबाईल फोन अंदाजे किंमत १९,४५,०००/- रूपये (अक्षरी एकोणिस लाख पंचेचाळीस हजार रूपये मात्र) असे शोध घेवुन ते ताब्यात घेवुन उल्लेखनीय कामगिरी केली आहे. नमुद सर्व मोबाईल फोन हे शुक्रवारी तक्रारदार यांना परत करण्यात आले.