नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– किरकोळ वादातून युवकाच्या हत्या करून पसार झालेल्या टोळक्याच्या मुसक्या आवळण्यात शहर गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकास यश आले आहे. वेगवेगळ्या भागातून या टोळीस जेरबंद करण्यात आले असून, त्यात दोन महिलांचाही समावेश आहे. अमृतधाम परिसरातील वीडी कामगार नगर येथे डोळय़ात मिरचीपुड टाकीत युवकाची निघृण हत्या करण्यात आली होती.
सुरज रविंद्र मोहिते (२२),रविंद्र साहेबराव मोहिते (४३) व एक महिला (रा.तिघे विहंग सोसा.विडी कामगारनगर) तसेच मच्छींद्र उत्तम जाधव (रा.स्वामी समर्थ केंद्राजवळ,विडी कामगारनगर) आणि अन्य एक महिला अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. विशांत भोये (२९) या युवकाची वीडी कामगारनगर भागात हत्या करण्यात आली होती. लहान मुलांना खेळतांना हटकल्याचा राग मनात ठेवत संतप्त टोळक्याने त्याच्यावर हल्ला करण्यात आला होता. महिलांकरवी मिरचीपुड डोळय़ात फेकून ही हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर परिरात तणाव निर्माण होवून वाहनांची जाळपोळ करण्यात आली होती. तसेच संशयितांना जोपर्यंत अटक होत नाही तो पर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका घेत मृत विशांतच्या नातेवाईक आणि आप्तासह जमावाने रास्ता रोको आंदोलन केले होते. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस हल्लेखोरांच्या मागावर असतांनात शहर गुन्हे शाखेचे अंमलदार विलास चारोस्कर यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने येवला तालूक्यातील नगरसूल गाठून सूरज मोहिते (२२), रवींद्र मोहिते (४३) आणि एका महिलेस बेड्या ठोकल्या. या पाठोपाठ विल्होळी येथील जैन मंदिर भागात मच्छिंद्र जाधव (३८) याच्या मुसक्या आवळण्यात आल्या मुंबई नाका भागात एक संशयित महिला पोलीसांच्या हाती लागली असून या गुन्ह्यातील पाच जणांना पोलीसांनी अटक केली आहे. ही कारवाई आयुक्त संदिप कर्णीक,उपायुक्त प्रशांत बच्छाव व सहाय्यक आयुक्त संदिप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली युनिटचे वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड,सहाय्यक निरीक्षक हेमंत तोडकर उपनिरीक्षक चेतन श्रीवंत,हवालदार महेश साळुंके,रविंद्र आढाव,प्रविण वाघमारे,प्रशांत मरकड,विशाल काठे,प्रदिप म्हसदे,विशाल देवरे अंमलदार नितीन जगताप,विलास चारोस्कर आप्पा पानवळ,मुख्तार शेख,राम बर्डे,राहूल पालखेडे,मिलींदसिंग परदेशी,देविदास ठाकरे,योगीराज गायकवाड,राजेश लोखंडे,अनुजा येवले,मनिषा सरोदे, किरण शिरसाठ व सुक्राम पवार आदींच्या पथकाने केली.