नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- कुटूंबियास जीवे ठार मारण्याची धमकी देत एकाने विवाहीतेवर वेळोवेळी बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सचिन रघुनाथ संधान (रा.लेखानगर) असे संशयिताचे नाव आहे. २७ वर्षीय पीडीतेने दिलेल्या फिर्यादी नुसार संशयित सन. २०२२ पासून तिच्यावर बळजबरीने अत्याचार करीत आहे.
कुटुंबियास जीवे ठार मारण्याची धमकी देत त्याने वेगवेगळया ठिकाणी घेवून जात कारमध्ये बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक सुहासिनी बारेला करीत आहेत.