नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – माजी नगरसेविका तथा राष्ट्रवादी काँग्रेस महिला शहराध्यक्ष योगिता आहेर यांच्या घरावर अज्ञातांनी दगडफेक करत मारहाण केल्याची घटना घडली आहे. घराबाहेर कामा निमित्ताने आहेर आपल्या वाहनाने पुत्र अश्लेष आहेर बरोबर जात असतांना ही घटना घडली. या घटनेनंतर योगिता आहेर यांनी सातपूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून संबंधितावर कारवाईची मागणी केली आहे.
या घटनेबाबत मिळालेली माहिती अशी की, काळे नगर येथील जॉगिंग ट्रॅक जवळ राहणाऱ्या योगिता आहेर व मुलगा अश्लेष आहेर हे दैनंदिन कामानिमित्त आपल्या चार चाकी वाहनाने घरा बाहेर पडत असताना आहेर यांच्या वाहनाला एका अज्ञात मोटरसायकलस्वाराने कट मारला. यावेळी संबंधिताना समजावून सागंत असतांना अगोदर मुलाला मारहाण करत शिवीगाळ करण्यात आली. त्यानंतर त्या दुचाकीस्वाराने फोन वरून आपल्या साथीदारांना हात्यारांसह बोलवले व आहेर यांच्या घरावर दगडफेक करत माजी नगरसेवीका आहेर तसेच भाऊ व इतर सदस्यांनाही मारहाण केली.
या घटनेनंतर संशयित आहेर यांच्या नातेवाईकांचा मोबाईल घेऊन फरार झाले. सदर प्रकरणी सातपूर व गंगापूर पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवत फरार असलेले महेश कटारे व करण कटारे बरोबर इतर साथीदारांचा शोध सुरू केल्याची माहिती पोलिसांनी दिली.