नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- पंचशिल नगर येथील भाजपा कार्यालयास लागून असलेला जीवन ज्योत मेन्सन बंगला चोरट्यांनी फोडला. या घटनेत चोरट्यांच्या हाती फारसे काही लागले नसल्याने त्यांनी पितळी नळ व लोखंडी पाईप असा सुमारे १८ हजाराचा ऐवज भामट्यांनी लांबविला असून याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विजय बापूराव कुलकर्णी (६३) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. कुलकर्णी कुटूंबिय काही दिवसांसाठी बाहेरगावी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरटयांनी ५ ते २४ नोव्हेंबर दरम्यान बंगल्याचा मागील दरवाजा तोडून ही चोरी केली. घरात शिरलेल्या चोरट्यांच्या हाती फारसे कारी लागले नसल्याने त्यानी दरवाजा व खिडकींच्या काचा फोडत व नासधूस करीत ही घरफोडी केली. इलेक्ट्रीक वायरीग तोडून तेच किचन व बेसिनचे नुकसान करीत भामट्यांनी बाथरूममधील नळाचे पितळी कॉक आणि लोखंडी नळ्या असा सुमारे १८ हजाराचा ऐवज खोलून नेला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक पवार करीत आहेत.
……