नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– पूर्व वैमनस्यातून तीन जणांच्या टोळक्याने एका तरूणावर धारदार चाकूने हल्ला केल्याची घटना सिडकोतील शिवाजीचौक भागात घडली. या घटनेत युवकावर चाकूने सपासप वार करण्यात आल्याने तो गंभीर जखमी झाला असून याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कुणाल कापसे,हर्षद दोंदे व कशिष बनकर अशी चाकू हल्ला करणा-या संशयितांची नावे आहेत. याबाबत मयुर एकनाथ सावंत (२२ रा.इंदिरा गांधी वसाहत लेखानगर) या युवकाने फिर्याद दिली आहे. सावंत गुरूवारी (दि.२१) सायंकाळच्या सुमारास शिवाजी चौकातील शॉपीग मागे असलेल्या गार्डन परिसरात गेला होता. या ठिकाणी संशयित त्रिकुटाने त्यास गाठून मागील भांडणाची कुरापत काढून शिवीगाळ केली.
या वेळी झालेल्या धक्काबुक्कीत संशयित बनकर याच्या सांगण्यावरून कापसे याच्या ताब्यातील चाकूने उर्वरीत दोघांनी त्याच्यावर वार केले. या घटनेत सावत जखमी झाला असून अधिक तपास जमादार बागुल करीत आहेत.