नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– रस्त्याने पायी जाणा-या महिलेचा दुचाकीस्वारांनी विनयभंग केला. ही घटना राणेनगर येथील शारदा शाळा भागात घडली. अश्लिल वर्तन करीत डबलसिट प्रवास करणा-या तरूणांनी हे कृत्य केले असून याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार पिडीत महिला मंगळवारी (दि.१९) शारदा शाळा भागातून रस्त्याने पायी जात असतांना दुचाकीवर डबलसिट आलेल्या दोघांनी तिचा विनयभंग केला. अश्लिल हावभाव व वर्तन करीत भामट्यांनी महिलेचा विनयभंग केला. अधिक तपास तपास हवालदार पवार करीत आहेत.
मोबाईलचे दुकान फोडून ६७ हजाराची चोरी
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- मोबाईलचे बंद दुकान फोडून चोरट्यांनी गल्यातील सुमारे ६७ हजार रूपयांची रोकड चोरून नेली. ही घटना वर्दळीच्या व शहरातील मोबाईल गल्ली म्हणून प्रशिध्द असलेल्या महात्मा गांधी मार्गावर घडली. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विपीन चमनाजी पटेल (रा.उदय कॉलनी,मखमलाबाद नाका) यांनी फिर्याद दिली आहे. पटेल यांचे एम.जी.रोड येथील प्रधान पार्क इमारतीत शिवशक्ती टेलीकॉम नावाचे मोबाईल खरेदी विक्रीचे दुकान आहे. गुरूवारी (दि.१४) रात्री अज्ञात चोरट्यांनी बंद दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून ही चोरी केली. दुकानात शिरलेल्या चोरट्यानी गल्यातील ६७ हजाराची रोकड चोरून नेली असून अधिक तपास हवालदार थेटे करीत आहेत.