नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- आर्थिक गुंतवणुकीतून अल्पावधीत मोठ्या नफ्याचे आमिष दाखवत सायबर भामट्यांनी शहरातील दांम्पत्यास तब्बल साडे ५८ लाख रूपयांना गडविल्याचा प्रकार समोर आला आहे. व्हॉटसअप ग्रुपच्या माध्यमातून विविध कंपनीत गुंतवणुक करण्याच्या बहाण्याने ही फसवणुक करण्यात आली असून याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात फसवणुकीसह आयटीअॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तपोवनातील सुरज धनुका यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. धनुका गेल्या सप्टेंबर महिण्यात इंटरनेवर गुंतवणुकीबाबत माहितीची पडताळणी करीत असतांना भामट्यांनी त्यांच्याशी संपर्क साधला होता. आयुषी पोखरीयाल व सुभाष सी अग्रवाल नाव धारन केलेल्या ७६५८८४३६८२, ७६३४८२०४०५ व ८९६११६९१५४ या मोबाईलधारकांनी एसएमसी ग्लोबल सेक्युरिटीज लि. या कपनीच्या व्हॉटसअॅप ग्रुपमध्ये धनुका यांना समाविष्ट केले. या ग्रुपवरील सदस्या भरघोस नफा मिळाल्याची हमी देवू लागल्याने धनुका दांम्पत्याची फसवणुक झाली. नामांकित कंपनीचे सामर्ध्य असलेले नाव वापरून तसेच मुळ कंपनी संचालकाचे नाव लावून तयार करण्यात आलेल्या ग्रुपमध्ये अनेक सदस्यांनी मोठा नफा झाल्याचे संदेश पाठविल्याने धनुका यांनी संबधीतांनी पाठविलेल्या बँक खात्यात तब्बल ५० लाख १२ हजार ८१९ रूपयांची रक्कम ऑनलाईन जमा केली.
तर त्यांच्या पत्नीनेही एन जे वन सेक्युरिटीज या कंपनीत ८ लाख ४३ हजार ९९९ रूपये वर्ग केले. या घटनेत धनुका दांम्पत्याची सुमारे ५८ लाख ५६ हजार ८१८ रूपयांची फसवणुक झाली असून दीड महिना उलटूनही पदरात एक रूपयाही न पडल्याने तसेच ग्रुपमधील सदस्यांचा संपर्क तुटल्याने धनुका दाम्पत्याने पोलीसात धाव घेतली आहे. अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक ढवळे करीत आहेत.