नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- बंद हॉटेल फोडून चोरट्यांनी गल्यातील दोन लाख रूपयांची रोकड चोरून नेली. ही घटना पेठरोडवरील न्यु उत्तम हिरा (घुंगरू) येथे घडली. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कैलास उत्तमराव चव्हाण (रा.चव्हाणवाडा,बुधवारपेठ) यांनी फिर्याद दिली आहे. चव्हाण यांचे पेठरोडवर पवार लॉन्स जवळ न्यु उत्तम हिरा (घुंगरू) नावाचे हॉटेल आहे. रेस्टॉरंट व परमिटरूम असलेल्या या हॉटेलचे रविवारी (दि.१७) रात्री चोरट्यांनी दरवाजाचे लॅचलॉक तोडून ही घरफोडी केली.
चव्हाण नेहमी प्रमाणे मध्यरात्री हॉटेल वाढवून घरी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी हॉटेल मधील गल्यात असलेली दिवसभराच्या व्यवसायाची सुमारे दोन लाखाची रोकड चोरून नेली. अधिक तपास उपनिरीक्षक जोशी करीत आहेत.