नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – लहान मुलीस खेळण्यास घेवून जात असल्याची बतावणी करीत एकाने शेजारी राहणा-या महिलेचा विनयभंग केल्याची घटना चेतनानगर भागात घडली. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दत्तात्रेय मुर्तडक असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.
सोनवणे मळा भागात राहणा-या विवाहीतेने याबाबत फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला व संशयित एकाच इमारतीतील रहिवासी असून, महिला बुधवारी (दि.१३) आपल्या लहनग्या मुलीला खेळवत असतांना संशयित तिच्या घरी आला होता. मुलीला मी सांभाळायला घेवून जातो असे म्हणत त्याने कड्यावरील मुलीस स्व:ताच्या ताब्यात घेतांना महिलेचा विनयभंग केला. अधिक तपास उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.